मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरकारकडून अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण मिळणार असल्याची देखील घोषणा केली आहे.
मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण –
राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या गेल्याचे दिसून येत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा अर्थसंकल्प सादर केला जात असल्याने सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये आता मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण मिळणार असल्याची देखील घोषणा करण्यात आलीय.
अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा मिळणार 1,500 रुपये
- ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार
- ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
- मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून निर्णय लागू (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविकांच्या अभ्यासक्रमांचा समावेश
- दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ – प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन
- संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ- एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ
- पिंक ई रिक्षा – 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य
- मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून निर्णय लागू (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविकांच्या अभ्यासक्रमांचा समावेश
- दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
- तृतीयपंथी धोरण-2024 जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ
- लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’ या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
- “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये
नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू - दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार
- अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड -प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान
जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण – 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
हेही वाचा : Breaking : लेक लाडकी योजनेची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा, काय संपुर्ण बातमी