ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 जुलै : मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय जनसुविधा कार्यालय सोमवार पासून सुरू करणार असून त्या जनसुविधा कार्यालयातून लाडकी बहीण योजनेचे काम आमचे पदाधिकारी करतील, अशी माहिती पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी दिली. दरम्यान, कोणीही या योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्यास थेट आपल्याकडे तक्रार करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.
पाचोरा शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे महिला सशक्तीकरण मेळाव्यात लाडकी बहीण योजनेबद्दल मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपस्थित सुमारे पाच हजार महिलांनी दोघे हाथ उंचावत शासनाच्या आभार व अभिनंदनाचा ठराव केला.
योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी कटिबद्ध –
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभा पासून मतदार संघातील एकही माता भगिनी वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनानाच्या साथीने आमदार म्हणून मी स्वतः व संपूर्ण शिवसेना पक्ष लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आम्ही कटिबद्ध असून तळागाळातील बहिणींना न्याय देण्यासाठी शिवसेनेने कायमच पुढाकार घेतला असल्याची ग्वाहीही आमदार किशोर पाटील यांनी दिली.
योजनांचा लाभ देऊन न्याय्य भूमिका –
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या शासनाने महिलांसाठी एस टी प्रवासातील सूट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील आदींच्या मानधनात केलेली भरघोस वाढ यासह संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देखील लाभाची रक्कम वाढवून देत खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ देऊन न्याय्य भूमिका घेतली आहे. शेतकरी, युवक, महिला, कामगार आदी घटकांच्या प्रगतीसाठी शासन काम करत असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली चव्हाण यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले तर गटविकास अधिकारी डॉ स्नेहल शेलार यांनी उपस्थित महिलांना लाडकी बहीण योजनेबद्दलची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी शहरी भागातील बचत गटाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील तसेच प्रदीप देसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके, भडगाव तहसीलदार नितीन बनसोडे, पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे, भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पाचोरा गटविकास अधिकारी डॉ स्नेहल शेलार, भडगाव गटविकास अधिकारी शे.अन्सार शे.अकबर,यावलच्या प्रकल्पाचे सहायक अधिकारी जावळे यांचेसह बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी. ए. पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, युवा नेता सुमित पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, माजी प.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, महेंद्र ततार, बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे, राहुल पाटील, शहर प्रमुख सुमीत सावंत, भोला पाटील, सुधीर शेलार, हेमंत चव्हाण, सुनीता पाटील, महिला आघाडीच्या नंदा पाटील, अंजली चव्हाण, सुषमा पाटील, रत्ना पाटील, मंदा ताई पाटील, भारती महाजन, सीमा महाजन, मंदाताई गंजे, सीमा पाटील, प्रियंका सोनवणे, संगीता पगारे, बेबाबाई पाटील, प्रवीण पाटील, सतिष पाटील, लोहारी माजी नगरसेवक बापू हटकर, गंगाराम पाटील, ताई पाटील, माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, आबा पाटील, विजय भोसले, सौरव पाटील, भडगाव यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी मानले.
हेही वाचा : मंत्री गुलाबराव पाटील यांची खासदार राहुल गांधींवर टीका, म्हणाले, “लोकसभेच्या निकालाने आलेली सूज…”