नवी दिल्ली/जळगाव, 29 जुलै : नवी दिल्लीत सध्या पावासाळी अधिवेशन सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या जळगावच्या महिला खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत भाजपच्या प्रतोतपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महिला खासदारांना कामकाजात प्रतिनिधित्व देण्यासाठी भाजपकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्मिता वाघ काय म्हणाल्या? –
पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आली असताना एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. यासाठी मी भाजपच्या नेतृत्वाचे मी नक्कीच धन्यवाद देते. संघटनेत बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. या दृष्टीकोनातून ही नवीन जबाबदारी माझ्यासाठी दृष्टीकोनातून आनंदाची आणि खुप मोठी आहे. यामध्ये सगळे मिळून आम्ही काम करणार आहोत. पद हे जरी एकट्या व्यक्तीला मिळाले असले तरी ती जबाबदारी सर्वांना मिळून निभावयची असते, अशा भावना खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत.
मी एका ग्रुपची जबाबदारी माझ्याकडे –
भाजपने प्रतोदपदी नियुक्ती केल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना स्मिता वाघ पुढे म्हणाल्या की, अधिवेशन काळातील जे जे विषय आहेत…ते ते विषय खासदारांपर्यंत पोहचावेत, यासाठी भाजपची अंतर्गत व्यवस्था आहे. त्यामुळे 12 खासदारांचा एक ग्रुप असे महिलांचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. यामध्ये एका ग्रुपची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे.
कामकाज सुटसुटीत होण्यासाठी ही व्यवस्था –
अधिवेशन काळात कामकाज करताना ते कामकाज सुटसुटीत व्हावे. कामकाजाच्या दिवशीचे जे काही विषय आहेत ते सगळ्या विषय आणि त्यासंदर्भातील सूचना खासदारांपर्यंत पोहचावेत. यासाठी सुटसुटीत अशी यंत्रणा असली पाहिजे. म्हणून 12 लोकांचा एक गट तयार केला जातो आणि त्या गटाची जबाबदारी एक व्यक्तीकडे दिली जाते. याप्रमाणे महिला खासदारांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. यापैकी एका गटाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. आणि यामाध्यमातून अधिवेशन काळातील कामकाज सुरळीतपणे व्हावे, आणि संबंधित खासदारांना आपले विषय चांगल्यापद्धतीने मांडता यावेत, यासाठी ही व्यवस्था असल्याचे स्मिता वाघ यांनी सांगितले.
हेही वाचा : “तुमचे जर पैसे हवे असतील तर….”, लाडकी बहिण योजनेवरून चाळीसगावात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?