धुळे, 10 सप्टेंबर : चार-चार वर्षांनंतर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यावर मोका लावयचा प्रकार करायचा, हा कुठला प्रकार आहे. याचे उत्तर त्यांनी आधी द्याव. मी यापुढेही जाऊन सांगेन की, त्यांची माझी नार्को टेस्ट करा, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना माझे थेट आव्हान असल्याचे सांगितले. ते आज धुळ्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
काय आहे संपुर्ण बातमी? –
भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना थेट आव्हान दिलंय.
View this post on Instagram
मंत्री गिरीश महाजन यांचे अनिल देशमुख यांना आव्हान –
मंत्री गिरीश महाजन धुळ्यात माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, चार वर्षानंतर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यावर मोक्का लावायचा, अशा पद्धतीचे काम अनिल देशमुख यांनी केलंय. दरम्यान, अनिल देशमुख यांनी माझ्यासमोर येऊन समोरासमोर बोलावे किंवा त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, त्याला सामोरे जाण्यास मी तयार असल्याचे सांगत, गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? –
जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर भाजपचे गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा, यावरुन वाद सुरू झाला होता. यामध्ये गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता. या प्रकरणात गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन तपास केला होता. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला होता, असा दावा एसपी मुंढे यांनी सीबीआयकडे केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?