नाशिक : भारतातील तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढत आहे. त्यामुळे अस्वस्थता जाणवत असल्यास चाचण्या करुण घेणे व तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. धावत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोगासाठी कारणीभूत असलेले कोलेस्ट्रॉल वेळोवेळी आपणांस धोक्याची सुचना देत असतो, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच छातीत दुखत असल्यास वेळोवेळी लिपिड प्रोफाईलसारखी चाचणी करुन हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे प्रतिपादन लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक हृदयरोग दिनानिमित्त कंटयुन्युइंग मेडिकल एज्युकेशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी यांनी सांगितले की, भारतातील तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढत आहे. त्यामुळे अस्वस्थता जाणवत असल्यास चाचण्या करुण घेणे व तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. धावत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोगासाठी कारणीभूत असलेले कोलेस्ट्रॉल वेळोवेळी आपणांस धोक्याची सुचना देत असतो, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच छातीत दुखत असल्यास वेळोवेळी लिपिड प्रोफाईलसारखी चाचणी करुन हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तरुण पिढीने आरोग्याचे महत्व जाणून सजग होणे गरजेचे आहे. यासाठी हृदयरोगाला टाळण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी, डॉ. विनोद विजन, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी सांगितले की, संशोधन प्रकल्पांसाठी अनेक संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे पंचकर्म, दृष्टी, ब्लोसम, नासिकल प्रकल्प अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर विद्यापीठातील आयुष विभाग प्रमुख डॉ. गितांजली कार्ले यांनी सांगितले की, नियमित व्यायाम आणि योग्य आहार याची आपण काळजी घेतली पाहिजे. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन घेतल्यास हृदयरोगास निश्चितच आपण टाळू शकतो. संतुलित आहार हा शरिरासाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विनोद विजन यांनी सांगितले की, हृदयविकारामुळे आपल्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिना चढताना-उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करु नये वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावेळी याप्रसंगी सी.ओ.एल.एस. जिवन रक्षक प्रणालीबाबत डॉ. विक्रांत विजन, डॉ. गुलशन तोलानी, डॉ. अब्दुल रॉफ, डॉ. सृष्टी विजन यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वाप्नील तोरणे यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. निलिमा चाफेकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाकरीता डॉ. सुप्रिया पालवे, डॉ. शृखंला कौशिक यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा – Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview