• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 16, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

पुणे, 16 जून : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू असून 51 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. इंद्रायणी नदीवरील पुल हा पादचाऱ्यांसाठी होता. मात्र, रविवार हा सुटीचा दिवस असल्याने पर्यटकांची खूप मोठी गर्दी त्याठिकाणी केली. क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक त्या पुलावर आले आणि त्यामुळे हा पूल कोसळला असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन तात्काळ पुण्यात दाखल –

पुणे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच नाशिकवरून मुंबईकडे जाणारे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तात्काळ कल्याणवरून पुण्याकडे रवाना झाले. काल सायंकाळी ते पुण्यात पोहचले. यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घटनेत गंभीर जखमी झालेल्या रूग्णांची पवना रुग्णालयात जाऊन मंत्री महाजन यांनी भेट घेतली.

मंत्री महाजन काय म्हणाले? –

मंत्री गिरीश महाजन माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की,  मला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पुण्याकडे रवाना झालो. खरंतर, 1992 पासूनचा हा पुल होता. आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी त्या पुलावर होती. त्या पुलाची क्षमता नसताना मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या पुलावर उभे राहिले आणि यामुळे ही अतिशय दुर्दवी घटना घडली. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाकडून देखील तात्काळ मदतकार्य राबविण्यात आले.


मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर –

कार्याचा आढावा घेतला. इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


चौकशी केली जाईल –

इंद्रायणी नदीवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता की नाही, याची देखील चौकशी केली जाईल. यासोबतच पूलाच्या कोसळण्यामागची कारणं नेमकी काय आहेत याचा देखील तपास केला जाईल. दरम्यान, वेळोवेळी नागरिकांना सूचना दिल्या जातात. यामुळे राज्यातील ज्याठिकाणी नदीचा प्रवाह जास्त असेल त्याठिकाणी नागरिकांनी जाताना काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले.

हेही वाचा : इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanindrayani bridge collapsepune newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page