ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 मार्च : कृषी क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल भडगाव येथील ए.व्ही.जाधव (सेवानिवृत्त कृषी अधिकारी, पाचोरा), नगरदेवळा येथील शेतकरी गट प्रमुख इंद्रनील साहेबराव भामरे पाटील यांना माणुसकी फाउंडेशन निफाड (नाशिक) यांच्यामार्फत अनुक्रमे कृषिभूषण व कृषीरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले.
निफाड येथे लक्ष्मी नागरी पतसंस्थेच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध पुरस्कार वाटपांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सिमा हिरे यांच्या हस्ते एन.व्ही जाधव यांना कृषिभूषण तर इंद्रनील पाटील यांना कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे व निफाड तालुका अध्यक्ष दिगंबर वडघुले व निफाड तालुक्यातील उपस्थित मान्यवर, नगराध्यक्ष, बँकेचे चेअरमन चोरडिया व विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी वर्ग उपस्थित होते.
हेही वाचा : Nandurbar : सत्तेत आल्यास जातीय जनगणनेची हमी, महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधींचे आश्वासन