• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 28, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई, 28 फेब्रुवारी: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनाचा पहिला आठवड्यात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रीमहोदयांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असताना संबंधित ब्रीफिंगसाठी बोलावूनही आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.

आयएएस एम. देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई –

विधानसभेतील चर्चेदरम्यान ही बाब समोर आल्यानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने निलंबन आदेश जारी करण्यात आला आहे. एम. देवेंद्र सिंग हे २०११ बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काही अधिकाऱ्यांमध्ये अहंकारी प्रवृत्ती वाढतेय – सुधीर मुनगंटीवार

सदर प्रकरणाबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती देताना सांगितले की, ब्रीफिंगसाठी न येण्याचा अधिकाऱ्यांचा निर्णय गांभीर्याने घेण्यात आला. अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर २४ तासांच्या आत कारवाई करण्यात आली. मंत्रीपदाचा व घटनात्मक व्यवस्थेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही अधिकाऱ्यांमध्ये अहंकारी प्रवृत्ती वाढत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

निलंबन काळातील अटी स्पष्ट –

अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ मधील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत एम. देवेंद्र सिंग यांचे मुख्यालय मुंबई राहील. कोकण विभागीय आयुक्त, मुंबई यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन काळात कोणतीही खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यापार-व्यवसायात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget session 2026ias officer m devendra singhias officer suspendedmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page