मुंबई, 11 सप्टेंबर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांबाबत मोठा बातमी समोर आली आहे. मलायका हिच्या वडिलांनी अर्थात अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील वांद्रे येथील आलमेडा पार्क या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून अनिल यांनी आयुष्य संपवलं. आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडल्याने मलायका अरोरा हिला मोठा धक्का बसलाय.
मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या –
मिळालेल्या माहितीनुसार, मलायका अरोरा हिचे वडिल अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे. मात्र, मलायकाच्या वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलले, त्यामागचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.
हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची, प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?
पुढील तपास सुरू –
अनिल अरोरा यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणास्तव केली, गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या आहेत का ज्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागले, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?