जळगाव, 12 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात राज्यभर दौऱ्यांचे आयोजन केले जात असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचा जिल्हा दौरा –
माजी मंत्री आदित्य ठाकरे हे गुरूवारी (15 फेब्रुवारी) रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते जळगाव, शिरसोली, कासोदा आणि भडगाव याठिकाणी सभा घेणार आहेत. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळाला असल्याचा दावा ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे.
अमित शहा गुरूवारी जळगावात –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील गुरूवारी जळगावात येत आहेत. भाजपकडून आयोजित केलेल्या युवा संमेलनास गृहमंत्री शहा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अमित शहा हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे.
हेही वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार, ‘हे’ आहे कारण