• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाच्या कामांचे प्रभावी नियोजन करण्याबरोबर तंत्रज्ञानाधारित संनियंत्रणावर भर द्यावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 11, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 11 ऑक्टोबर: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

जलसंधारणासाठी एकात्मिक कार्ययोजना तयार करा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणेने विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उत्तम नेतृत्व व कार्यक्षमता दाखविली आहे. अडचणीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा उत्साहाने आणि जबाबदारीने कामाला लागल्यास कामाचा वेग वाढतो, हे आपण अनुभवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेपासून काम सुरू असल्याचे चित्र यापूर्वी दिसले आहे. त्याच कार्यतत्परतेने आणि समर्पित भावनेने आता जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

जलसंधारणाच्या कामांसाठी या बैठकीत निश्चित झालेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययोजना तयार करावी. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारण्याबरोबरच कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण प्रणाली विकसित करावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून परस्पर समन्वयातून अंमलबजावणी करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेत कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

पहिला पाऊस पडताच जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत

जलसंधारणाची कामे केवळ कागदावरील नियोजनापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात परिणामकारकपणे पूर्ण झाली पाहिजेत. पहिला पाऊस पडताच पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाच्या संरचना सज्ज असतील आणि त्यातून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होईल, अशा पद्धतीने कामांचे नियोजन व अंमलबजावणी करावी. या प्रयत्नांतून गावांना दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकता येतील आणि जनतेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

जलसंधारणाची ही महत्त्वपूर्ण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी एकजुटीने सहभागी व्हावे आणि या मोठ्या लढाईसाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवणे आवश्यक – अभिनेते आमिर खान

आगामी उन्हाळ्यापासून जलसंधारणाची कामे सातत्याने राबविण्याचे गरजेचे आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल. यंदाचे वर्ष आव्हानात्मक असले, तरी निराशेचे रूपांतर आशेत करून जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. पाण्याचा पुनर्वापर, भूजल पुनर्भरण आणि जलस्रोतांचे संवर्धन यावर भर देतानाच, राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराने जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असेही अभिनेते आमिर खान यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, अभिनेते आमिर खान, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

हेही वाचा: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisDroughtdrought-free maharashtramarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

November 14, 2026
जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

November 14, 2026
समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

November 14, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

November 13, 2026
हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 13, 2026
NQAS प्रमाणनात जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 125 उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

NQAS प्रमाणनात जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 125 उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

November 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page