• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘108’ रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी; नऊ वर्षांत वाचवले लाखो रूग्णांचे प्राण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 14, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
रूग्णवाहिका (फाईल फोटो)

रूग्णवाहिका (फाईल फोटो)

जळगाव, 14 ऑक्टोंबर : रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘108 रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील 2 लाख 71 हजार 855 नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. 51 हजार 503 महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून 1 हजार 198 बाळांचा जन्म रूग्णवाहिकेत झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या महत्वाच्या सूचना –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘108’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘108’ रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.

लाखो रूग्णांचे वाचवले प्राण –
कोरोना काळात देखील ‘108’ रूग्णवाहिकेने मोलाची भूमिका निभावली असून या रूग्णवाहिकेमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशिन, ऑक्सिजन सिलेंडर व सोबत डॉक्टर उपलब्ध राहत असल्यामुळे आरोग्य विभागावरील बराच ताण कमी झाला आहे. राज्यात 2014 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत 91 लाख 21 हजार 974 रुग्णांना 108 रूग्णवाहिकेमुळे जीवदान मिळाले आहे.

कोविड काळातही महत्त्वाची भूमिका –
कोरोना काळात 35 रुग्णवाहिकांनी 15 हजार 793 कोविडच्या रुग्णांना सेवा दिली असून 1 लाख 16 हजार 916 नॉन कोविड रुग्णांसाठी मार्च 2020 ते सप्टेंबर 2023 दरम्यान सेवा बजावली आहे. तसेच विविध आजारांच्या 64 हजार 458 रुग्णांना रूग्णवाहिकेने सेवा दिली आहे.

रूग्णांना मिळाली संजीवनी –
जळगाव जिल्ह्यात 2014 पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त 20 हजार 625 रूग्ण तसेच हाणामारीचे 4 हजार 415 रुग्णांना तर, 1 हजार 45 जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे 1 हजार 558 रुग्ण, उंचावरून पडणे 4 हजार 528 रुग्ण, विषबाधा झालेले 12 हजार 646 रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या 325 रुग्णांना, 795 मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 331 रूग्णांना सेवा मिळाली आहे.

रुग्णवाहिकेचा मोठा आधार –
वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘108’ रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी ‘108’ रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे, असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते? –
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘108रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 108या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. 108च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही 108मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

बातमी शेअर करा !
Share
Tags: 108 ambulanceambulancejalgaon health

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page