अहमदनगर, 16 सप्टेंबर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून बाहेर आल्यावर केजरावाल यांनी रविवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या घोषणेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या घोषणेवर बोलताना अण्णा हजारे यांनी सांगितले की, मी सुरूवातीलाच अरविंद केजरीवाल यांना समाजसेवा करत राहा. राजकारणात जाऊ नका तसेच भविष्यात मोठे माणूस होताल, असे सांगितलं होते. तसेच आम्ही अनेक वर्षे सोबत राहिले आहोत. त्यावेळी मी त्यांना कायम सांगत होतो की, राजकारणामध्ये न जाता समाजसेवा करा. आणि समाजसेवा केल्याने खूप आनंद मिळतो. परंतु, मी दिलेला सल्ला त्यांनी ऐकला नाही आणि आता या परिस्थितीला सामोर जावे लागत असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
केजरीवाल यांनी काय म्हटलं होतं? –
घेत केजरवाल यांनी सांगितले की, जेव्हा मी तुरुंगात होतो, तेव्हा भाजपच्या लोकांनी केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा का दिला नाही, असे विचारले. मी तुम्हाला विचारण्यासाठी आलो आहे की तुम्ही केजरीवाल मानता का? जोपर्यंत जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी जामीनावर सुटका झाल्यानंतर रविवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. दरम्यान, दोन दिवसांत आपण जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले आहे.
जामीनावर सुटका –
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने हा काही अटी शर्थींसह केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता.
अरविंद केजरीवालांना ‘या’ अटींवर जामीन मंजूर –
- अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाता येणार नाही.
- या प्रकरणाबाबतीत बाहेर कुठेही चर्चा करता येणार नाही.
- या प्रकरणातील तपासामध्ये अडथळा किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही.
- गरज लागली तर कोर्टात हजर राहून तपासामध्ये सहकार्य करणार.