• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी!, एरंडोलमधील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी SIT स्थापन, जळगाव पोलीस अधीक्षकांचे आदेश, आतापर्यंत काय काय घडलं?, संपूर्ण माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 28, 2025
in जळगाव जिल्हा, एरंडोल, ताज्या बातम्या
SIT formed in the murder case of a minor boy in Erandol, orders from Jalgaon Superintendent of Police

मोठी बातमी!, एरंडोलमधील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी SIT स्थापन, जळगाव पोलीस अधीक्षकांचे आदेश, आतापर्यंत काय काय घडलं?, संपूर्ण माहिती

जळगाव, 28 जून : जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील 13 वर्षीय तेजस महाजन याच्या खून प्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याप्रकरणी एसआयटी म्हणजे विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण –

याप्रकरणी गजानन नामदेव महाजन (वय-४५, रा. रिंगणगाव रा. एरंडोल, जि. जळगाव) यांनी 16 जून रोजी एरंडोल पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, त्यांचा 14 वर्षांचा अल्पवयीन मुलाला 16 जून 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास त्यांचे राहत्या घरून कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले. या दिलेल्या तक्रारीवरुन एरंडोल पोलीस स्टेशन येथे CCTNS गु.र.क्रं. ९७/२०२५ भारतीय न्याय संहोता २०२३ चे कलम १३७ (२) अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून एरंडोल गोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी गावातील लोकांच्या मदतीने गाव परिसरात शोध मोहीम राबविली होती. त्याप्रमाणे गावाबाहेरील रिंगणगाव खर्च रोडलगत असणाऱ्या पडक्या शेतात एका काटेरी झाडाझुडपात अल्पवयीन मुलाचा मृतदेह ग्रामस्थांना मिळून आला होता.

सदर मृतदेहाची पाहणी केली असता, त्याच्या गळ्यावर कुणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी करुन त्याला जीवे ठार मारले होते. त्यानुसार सदर गुन्ह्यात 17 जून 2025 रोजी रोजी भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३(१),६१ (२),१४०(१), ३ (५) प्रमाणे वाढ करण्यात आली होती.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे अधिकारी कर्मचारी यांचे 3 पथके तयार करुन 24 तासांच्या आत नमुद गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर अटक आरोपी यांच्याकडुन तिसरा आरोपी नामे रिचडीया तुकाराम कोठवले (वय 20) याचे नाव समोर आले होते. त्यावरुन नमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तसेच सदरचा प्रकार हा नरबळी असल्याची शक्यता फिर्यादींनी व्यक्त केली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा तपास तत्काळ जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग केला होता.

यानंतर तिसरा आरोपी रिचडिया तुकाराम कोठवले याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने तपासासाठी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यात नमूद आरोपी इसम रिंगणगाव ता. एरंडोल परिसरात आलाच नसल्याचे गुन्ह्यातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक तपासात निष्पन्न होत आहे. मात्र, नमुद अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी रिंगणगाव येथेल कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयीत इसम हा फिर्यादी यांच्या शेतात काम करणारा कामगार (सालदार) असुन, तो पुढे आणि त्याच्या गाडीमागे अल्पवयीन मुलगा चालताना दिसत आहे, म्हणून त्याचा देखील या गुन्हयात सहभाग असेल? अशी शक्यता वर्तवल्याने व फिर्यादी यांच्या पुरवणी जबाबावरुन संशयीत इसम सुरेश बारसिंग बारेला (वय 25, रा. चिचाळे, गायरान तिनगावच्या पुढे, ता. यावल, जि. जळगाव) यालादेखील पोलिसांनी 25 जून 2025 रोजी नमूद गुन्ह्यात अटक केली.

सध्या 1 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी रिंमाडमध्ये आहे. तसेच या गुन्हयाचे अनुशंगाने फिर्यादी यांनी पुरवणी जबाबात त्यांच्या अल्पवयीन मुलाचा नरबळी करीता खून झाला भाहे, अगे सांगितल्यावरुन नमूद गुन्ह्यात 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अपोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) नुसार वाढ करण्यात आली आहे.

फिर्यादींच्या 5 प्रमुख मागण्या –

नमुद गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादी तसेच रिंगणगाव येथील स्थानिक नागरिक यांनी प्रमुख 5 मागण्या केल्या होत्या. यामध्ये १) सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात गावा २) नमुद गुन्ह्यात नरकळीचे कलम वाढवून त्यानुसार तपास केला जावा ३) नमूद गुन्ह्यात रिंगणगाव येथील कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीवी फुटेजमध्ये दिसणारा संशयीत इसम हा फिर्यादी यांच्या शेतात काम करणारा कामगार असून, तो पुढे व त्याच्या पाठीमागे अल्पवयीन मुलगा चालताना दिसत आहे. त्या संशयित इसमाला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे ४) या गुन्ह्यात सरकारी अभियोक्ता म्हणून उज्वल निकम यांची नेमणुक करुन, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ५) सदर गुन्ह्याचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. दरम्यान, त्याप्रमाणे वरील 3 मागण्या यापुर्वीच पूर्ण करण्यात आल्या असून उर्वरीत दोन मागण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण पाठपुरावा करणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

एसआयटी पथक स्थापन, कुणाकुणाचा समावेश

तसेच सदर गुन्ह्याचे गांभीर्य, फिर्यादी तसेच रिंगणगाव नागरिक यांच्या जनभावना लक्षात घेता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सदर गुन्ह्यात विशेष पोलीस पथक (SIT) ची स्थापना केली आहे. या पथकामध्ये कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव (पर्यवेक्षण अधिकारी; विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग. (तपास अधिकारी), जितेंद्र वल्टे पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव (सहा. तपास अधिकारी), संदीप पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव (सदस्य), निलेश गायकवाड, पोलीस निरीक्षक एरंडोल (सदस्य), पोना सचिन पाटील एरंडोल पो.स्टे. (सदस्य), पोशि राहुल कोळी नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव (रुदस्य) यांचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येणार आहे.

जळगावात आक्रोश मोर्चा – 

दरम्यान, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथं 14 वर्षीय मुलाची हत्या झाल्याप्रकरणी या घटनेच्या विरोधात शुक्रवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर रिंगणगाव ग्रामस्थांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस नरबळीच्या शक्यतेला महत्त्व देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

खासदारांना विचारला जाब – 

दरम्यान, एरंडोलमधील या दुर्दैवी घटनेला तेरा दिवस उलटूनही कोणात्याही राजकीय व्यक्तीने याबाबत चौकशी केली नाही. यावेळी शुक्रवारी खासदार स्मिता वाघ आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्या. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांनी मोठा आक्रोश करत खासदार स्मिता वाघ यांना धारेवर धरले त्यांना जाब विचारला. तसेच 13 दिवस राजकीय नेत्यांना हा आक्रोश दिसला नाही का? असे म्हणत ग्रामस्थांनी खासदारांसमोर आपला संताप व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newserandolerandol newsjalgaonjalgaon policejalgaon spmarathi newsmurderringangoan murder case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page