ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे येथील तुळजाई शिक्षण मंडळ पाचोरा संचलित माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात मुलांच्या सुप्त कलागुणांना व उपक्रमशीलतेला वाव देण्यात आला. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये गणेश वंदना. रिमिक्स सॉंग, बंजारा, आदिवासी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनावर आधारित गीत, धर्मवीर संभाजी महाराज नाटिका, शेतकरी गीत, जोगवा या गाण्यावर नृत्य अविष्कार सामाजिक लोककला ऐतिहासिक नाटिका अशा विविध कलागुणांनी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या सर्व मुलांच्या कलागुणांचा उपस्थित मान्यवर व गावकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील सर यांनी केले. तर आभार शाळेचे मुख्याध्यापक सागर पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विजय पवार, तुळजाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निखिल दिलीप पाटील, मराठा प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष सोपान गव्हांडे, सविता गव्हांडे, पाचोरा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष किरण पाटील, केंद्रप्रमुख वाडी सखाराम महाजन, सरपंच पिंप्री सार्वे अमोल बाविस्कर, अर्जुन गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, गजानन लाधे, बबलू पाटील, संदीप परदेशी, अजित तडवी, सागर पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.






