संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 12 जानेवारी : पारोळा समादेशक अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार हा ब-याच कालावधी पासून अंशकालीन लीपिक सुरेश धुडकू पाटील यांच्याकडे होता. दरम्यान, सुरेश धुडकू पाटील यांच्याकडे असलेला अतिरिक्त पदभार रद्द करण्यात आला असून वरिष्ठ पलटन नायक अरूण भगवान पाटील यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे.
समादेशक पदी अरूण पाटील –
समादेशक अधिकारी हे पद म्हत्वाचे असल्याने समादेशक अधिकरी यांची नेमणूक होणे आवश्यक आहे. असे असताना पारोळा समादेशक अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार अंशकालीन लीपिक सुरेश धुडकू पाटील यांच्याकडे होता. आता त्यांचा हा अतिरिक्त पदभार रद्द करण्यात आला असून वरिष्ठ पलटन नायक अरूण भगवान पाटील यांच्याकडे समादेशक अधिकारी पथक पारोळा या पदाचा पदभार देण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमागार्ड अशोक नखाते यांनी याबाबतचे आदेशपत्र काढले आहेत. अरुण भगवान पाटील यांनी सुरेश धुडकू पाटील यांचेकडे असलेल्या समादेश अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तात्काळ स्विकारावा. तसेच समादेशक अधिकारी या पदाचा पदभार मोजुनमाप करुन आपल्या ताब्यात घेण्यांत यावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वरिष्ठ पलटन नायक अरूण पाटील यांची समादेशक अधिकारी या पदाची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरुपाची असुन त्यांचे कामाचे स्वरुप पाहुन केव्हाही रदद करण्यांत येईल. सदर अधिकार हे जिल्हा समादेशक यांना आहे. तरी अरूण भगवान पाटील यांनी आदेशाच्या दिनांकापासून समादेशक अधिकारी पथक पारोळा या पदाचा पदभार स्विकारुन तसा अहवाल या कार्यालयास पाठविण्यांत यावा, असे अशोक नखाते यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.