मुंबई, 12 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रथमच माध्यमांसोबत संवाद साधला.
अशोक चव्हाण काय म्हणाले? –
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. याविषयी ते म्हणाले की, आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन. पक्ष सोडताना तसे कोणतेही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचे कारण सांगता येणार नाही. मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून मी राजीनामा दिला.
उद्धव ठाकरेंचा टोला –
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली आणि आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय? असा टोला ठाकरे यांनी लगावला. अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय, असा प्रश्न देखील ठाकरेंनी उपस्थित केला.
हेही वाचा : Ashok Chavan Resigns : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम