मुंबई. 12 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या राजकाराणातून आताच्या क्षणाची सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा –
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज सकाळपासूनच नॉट रिचिबल येत होते. दरम्यान, नाना पटोले यांना पत्र लिहित काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाण यांनी राजीनामा हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
आमदार पदाचा राजीनामा –
अशोक चव्हाण यांनी ट्विट करत आमदार पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. आज सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.