जळगाव, 6 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय. अशातच आता भारतीय जनता पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख व प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये खान्देशात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री जयकुमार रावल तसेच तसेच मंत्री संजय सावकारे यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हे निवडणूक प्रमुख असणार आहे.
भाजपचे खान्देशातील निवडणूक प्रमुख –
- नंदुरबार – रक्षा खडसे
- धुळे – जयकुमार रावल
- जळगाव – संजय सावकारे
भाजपचे खान्देशातील निवडणूक प्रभारी –
- नंदुरबार – विजय चौधरी
- धुळे शहर – अनुप अग्रवाल
- धुळे ग्रामीण – कुणाल पाटील
- जळगाव शहर – सुरेश (राजूमामा) भोळे
- जळगाव पुर्व (रावेर) – नंदु महाजन
- जळगाव पश्चिम – मंगेश चव्हाण
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.@RaviDadaChavan #BJP #Maharashtra pic.twitter.com/vpPv6F5izI
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 5, 2025
पहिल्या टप्प्यात नगरपरिषद-नगरपंचायतच्या निवडणुका –
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद-नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये नगरपरिषद-नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असून आगामी काळात राजकीय वातारवण तापणार असल्याचे दिसून येत आहे.






