नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत. दरम्यान, आज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
जळगावात कुणाला मिळाली संधी?
- जामनेर – गिरीश दत्तात्रय महाजन
- जळगाव शहर – सुरेश भोळे (राजू मामा)
- भुसावळ – संजय सावकारे
- चाळीसगाव – मंगेश चव्हाण
- रावेर – अमोल जावळे
धुळे जिल्हा
- धुळे शहर – अनुप अग्रवाल
- सिंदखेडा – जयकुमार रावल
- शिरपूर – काशिराम पावरा
नंदुरबार जिल्हा
शहादा – राजेश पाडवी
नंदुरबार – विजयकुमार गावीत
हेही वाचा : Video : निवडणुकीच्या घोषणेपुर्वीच आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील ‘या’ कामांसाठी आणले 10 करोड रूपये