नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात महिला वर्ग आणि तरुणांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहोत तसेच पीएम आवास योजनेतील ७० टक्के घरे महिलांना देण्यात येतील, अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामण यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? –
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पूर्ण बजेटप्रमाणे पायाभूत सुविधांवर भर दिला असल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केल. तसेच त्यांनी अर्थसंकल्पाच्या निमित्त देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या? –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की, गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या चार प्रमुख जातींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून त्यांच्या गरजा, आकांक्षा आणि कल्याण यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे तरच देश पुढे जाऊ शकतो. या चारही घटकांना त्यांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी सरकारचा पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणाला काय मिळाले? –
- 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नसून प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार
- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सरकार 2 कोटी घरे बांधणार
- रूफटॉप सोलर प्रोग्रामद्वारे 10 दशलक्ष घरांना मोफत वीज मिळेल.
- अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनाही आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केले जाणार
- पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाणार
- मनरेगा योजना 43 टक्क्यांनी वाढवून 86 हजार कोटी रुपये करत या योजनेत 7 हजार 500 कोटी रुपये गुंतवण्यात आले.
- आयुष्मान योजनेत 4.2 टक्यांनी वाढ
- पीएलआय योजना 33.5% वाढवून 6 हजार 200 कोटी रुपये करण्यात आली
- लक्षद्वीपमधील पर्यटन विकासासाठी निधी
- या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक 6.2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
- आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य सुविधा सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवल्या जातील
- 9-14 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस मोफत
- उडान योजनेंतर्गत 517 नवीन विमान मार्ग सुरू करण्यात येणार
अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांनी दिली माहिती –
- 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ
- पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत
- 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले
- तीन हजार नवीन आयटीआय उघडले यातून 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले
- पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा
- 78 लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली
- आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेत 5.8 टक्के घसरण झाल्यानंतर 2021-22 मध्ये 9.1 टक्के वाढ
- मागील आर्थिक वर्षात 26.99 लाख कोटी कर प्राप्त झाला, यावर्षी अंदाजे 30 लाख कोटी कर प्राप्त होण्याची शक्यता