मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 4 ऑक्टोबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती तसेच परिवर्तन शक्तीसह इतर पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. दरम्यान, उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज 4 नोव्हेंबर रोजी माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस होता. दरम्यान, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून एकूण उमेदवारांनी माघार घेतली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
चोपडा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीकरिता दाखल केलेल्या अर्जांपैकी 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यानंतर आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये एकूण 7 उमेदवार अर्ज मागे घेतला असून 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.
‘या’ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे –
1. गौरव चंद्रकांत सोनवणे
2. डॉ. बारेला चंद्रकांत जामसिंग
3. शुभम गिरीष विसवे
4. जगदीशचंद्र रमेश वळवी
5. भूषण मधुकर भिल
6. साहेबराव कौतिक सैंदाणे उर्फ बाळासाहेब
7. रुस्तम नसिर तडवी
‘हे’ उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात –
1. चंद्रकांत बळीराम सोनवणे – शिवसेना (शिंदे गट) – धनुष्यबाण
2. प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे – शिवसेना (उबाठा) – मशाल
3. युवराज देवसिंग बारेला – बहुजन समाज पार्टी – हत्ती
4. सुनिल तुकाराम भिल – भारतीय आदिवासी पार्टी – हॉकी व बॉल
5. अमित सिराज तडवी – अपक्ष – चिमणी
6. अमिनाबी रज्जाक तडवी – अपक्ष – बॅट
7. बाळू साहेबराव कोळी – अपक्ष – शिटी
8. संभाजी मंगल सोनवणे – अपक्ष – कपाट
9. हिरालाल सुरेश कोळी – अपक्ष – ऊस शेतकरी
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे आणि विविध अधिकारी हजर होते.
हेही वाचा : मोठी बातमी! अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, नेमकं काय प्रकरण?