• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 1, 2026
in पाचोरा, क्राईम, ताज्या बातम्या
चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 1 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यात शेतातील कॉपर वायर, इलेक्ट्रिक मोटर, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून भंगार दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी भोकरी आणि कुऱ्हाड येथील चार भंगार दुकानांची तपासणी करून एकूण 75 हजार 400 रुपये किमतीची कॉपर व ॲल्युमिनियमची तार जप्त केली. या प्रकरणी चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे तसेच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.

चार दुकानांत संशयास्पद तारसाठा –

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 सप्टेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भोकरी येथील भंगार दुकानांची तपासणी केली. यावेळी कलीम नबी काकर यांच्या दुकानातून ३२ हजार रुपये किमतीची ३२ किलो कॉपरची तार, हकीम अब्बाज काकर यांच्या दुकानातून १० हजार रुपये किमतीची १० किलो कॉपरची तार, तर राजू उस्मान काकर यांच्या दुकानातून १ हजार ४०० रुपये किमतीची १४ किलो ॲल्युमिनियमची तार आढळून आली.

तसेच लोहारा दूरक्षेत्रांतर्गत कुऱ्हाड येथील अब्बुजर हकीम काकर यांच्या भंगार दुकानातून ३२ हजार रुपये किमतीची ३२ किलो कॉपरची तार मिळून आली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ७५ हजार ४०० रुपये आहे.

भंगार दुकानदारांकडे या साहित्याच्या खरेदी-विक्रीबाबत आवश्यक कागदपत्रे व पुरावे मागविण्यात आले. मात्र, समाधानकारक माहिती किंवा कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने संबंधित चौघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या तारांचा चोरीच्या विविध गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधितांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोहेकॉ अतुल पवार, अभिजीत निकम, पोना दीपक अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण देशमुख, भारत पाटील, शाम हटकर, मनोज बडगुजर आणि नामदेव इंगळे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

बातमी शेअर करा !
Share
Tags: copper and aluminium wire stockcrime newspimpalgaon hareshwar police stationscrap dealerssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

October 1, 2026
चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

October 1, 2026
नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

October 1, 2026
माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

September 30, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

September 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page