सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 19 मार्च : भारतीय संस्कृतीत परंपरा, धर्म, संस्कार यात देवा धर्माला अग्रस्थान स्थान दिले आहे. कोणतेही कार्य असो त्या कार्याची सुरुवात ही देवदेवता, कुलस्वामिनी पुजनानेच केली जात असते. याबरोबरच हिंदु धर्मात चारधाम यात्रेला खुप महत्व दिले आहे. जीवनात आल्यानंतर ही यात्रा अत्यंत शुभ मानली जाते. वयाच्या 87 वर्षी ही चार धाम यात्रा सुखरूप केल्यानंतर पारोळा येथील नावरकर दाम्पत्याचे विषेश कौतुक होत आहे. सपत्नीक यात्रा सफल झाल्यानंतर या परिवाराने आज गंगापूजन आयोजित केले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पारोळा येथील पुंडलिक गोपाळ नावरकर व प्रमिला पुंडलिक नावरकर दाम्पत्याने नुकतीच उत्तराखंडमधील बद्रीनाथ, तामिळनाडुचे रामेश्वरम, ओडिसा येथील पुरी, व गुजरात मधील द्वारका यात केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या चार तिर्थक्षेत्राचा चारधाम यात्रा केली असुन आज या कुटूंबाकडून पारोळ्यात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, नद्यांचे पवित्र तिर्थाचे देव देवतांचे सहवाद्य मिरवणुक पुजन केले जाणार आहे.
पुंडलीक नावरकर यांनी सन 1962 सालापासून राजकिय वारसा बरोबरच सामाजिक, धार्मिक, सहकार, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. बालपणापासूनच देशभक्तीचे व समाज सेवेचे व्रत अंगी स्वीकारले. प्रजा समाजवादी पक्षाचे तरुण कार्यकर्ते म्हणुन जळगांव जिल्ह्यात नावारूपाला आले. पक्षाचे काम करत असताना त्यांचा जयप्रकाश नारायण, ना. ग. गोरे, मृणाल गोरे अशा अनेक जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने समाज कार्य चालु ठेवले. त्यांनी पारोळा नगरसेवकसह अनेक महत्वाची पदे भुषविली आहे.
हेही वाचा : चोपडा तालुक्यातील वडती येथे 40 वर्षांनंतर पवित्र शिवमहापुराण कथेचे आयोजन






