• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांना श्रद्धांजली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to senior leader Shivraj Patil-Chakurkar

'महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांना श्रद्धांजली

नागपूर, 12 डिसेंबर : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे राजकारण- समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो आहोत, अशी शोकभावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणात पाऊल टाकले. महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, संसदेच्या अनेकविध समित्यांचे सदस्य,आणि पुढे केंद्रातील विविध खात्यांचे मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकिर्द राहीली. लोकसभा सदस्य म्हणून ते सातवेळा निवडून आले होते.

लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना आवर्जून चालना दिली. चाकूरकर यांचा वकील म्हणून संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यातूनच त्यांनी लोकसभेतील संसदीय कार्य प्रणाली आणखी बळकट केली. तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते.

चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकारण-समाजाकारणात सभ्यता, सुसंस्कृतता जपणारे, लोकशाहीवर गाढा विश्वास असणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे मानतो. चाकूरकर कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chief Minister Devendra Fadnaviscm devendra fadnavisShivraj Patil ChakurkarShivraj Patil Chakurkar death

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

February 18, 2026
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page