• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

पान‍िपतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
पान‍िपतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नवी दिल्ली, 14 जानेवारी : मराठयांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे दिली.पानिपत युध्दाला 264 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पानिपत येथील काला आम परिसरात मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

पानिपत शौर्य समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन –
मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत 19 वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागर‍िक मोठया संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही उभारणार –
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या युध्द मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले. त्यानंतर झालेल्या अनेक मोहिमा मराठयांनी जिकंल्याच नाही तर अटकेपर्यंत झेंडा फडकविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळयांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठयांनी एका काळी राखले. ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया असेही ते म्हणाले.

दरम्यान, या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे नमूद करुन या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही मनोगते मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी. समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यातं आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धाणक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानीपत सार्वजानिक मराठा गणेश मंडल, यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा : Update : वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायलयीन अन् ‘मकोका’, आता पुढे काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhatrapati shivarji maharajcm devendra fadnavismarathi newspanipatsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page