• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात होणारी वाहतूक कोंडी तसेच वाढत्या अपघातांवरून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला पत्राद्वारे केल्या महत्वाच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 27, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
जळगावात होणारी वाहतूक कोंडी तसेच वाढत्या अपघातांवरून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला पत्राद्वारे केल्या महत्वाच्या सूचना

जळगाव, 27 जुलै : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी तसेच वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल 26 जुलै रोजी विशेष बैठक घेतली. त्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग व वाहतुक नियमन संदर्भात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, रस्त्यातील अतिक्रमण संदर्भात जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्गवाल्यांना काय सांगितलंय? –
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग यांच्या पत्रात ‘आकाशवाणी चौक, अजिंठा चौक आणि इच्छादेवी चौक येथे वाहतूक सिग्नल उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. धुळ्याकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंबलरच्या पट्ट्या तसेच रिफ्लेक्टरही देण्यात येतील. वरील तिन्ही ठिकाणचे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, तसेच या तिन्ही जंक्शनवर यापूर्वी प्रस्तावित केलेल्या उड्डाणपुलांच्या प्रस्तावाची प्रत लवकरात लवकर या कार्यालयात सादर करावी, अशा सूचना केल्या आहेत.

महापालिका आयुक्तांना काय नेमक्या सूचना? –
महानगरपालिका आयुक्त यांना ‘जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली व ईच्छादेवी चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. परिणामी सदर तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झालेले झालेले आहेत. त्याठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांना काय आहेत सूचना? –
जिल्हा पोलीस अधिक्षक यांना आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली व ईच्छादेवी चौक येथील रहदारी नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याबाबत त्यांच्या स्तरावरुन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. वाहतुक कोंडी होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना वेळोवेळी स्मरणपत्र देण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याविषयाचे गांभिर्य ओळखून तात्काळ कार्यवाही करावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमित पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा : श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector ayush prasadjalgaon accidentssuvarna khandesh live latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page