ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 जानेवारी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अशुअरन्स सेल (आय क्यू एस सी) विभागाच्या वतीने 9 डिसेंबर 2024 पासून एक महिन्यासाठी सर्टिफिकेट कोर्स इन स्पोकन इंग्लिश हा वर्ग महाविद्यालयात घेण्यात आला. या स्पोकन इंग्लिश वर्गाचा समारोप संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा एस. एस. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या वर्गात इंग्रजीचे उच्चारशास्त्र, व्याकरण, भाषेचे अलंकार, मुलाखत तंत्र, संभाषण कौशल्य, इंग्रजी साहित्य यासंबंधी मार्गदर्शन केले गेले. डॉ अतुल सूर्यवंशी यांनी सदर वर्गाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. या वर्गात शितल अकॅडमीचे प्रमुख रोहन पाटील, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. संजिदा शेख, निलेश क्षीरसागर यांनी अतिथी प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन केले.
सदर वर्गाच्या समारोपानंतर सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. इंटरनल क्वालिटी अशुअरन्स सेलचे प्रमुख डॉ. शरद पाटील यांनी समारोपाच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी तर प्रा. संजिदा शेख यांनी आभार मानले.
संस्थेचे संजयनाना वाघ यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांचे अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर अशा मार्गदर्शन वर्गांच्या आवश्यकतेचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. आर. बी. वळवी, डॉ. शरद पाटील, डॉ. दिलीप पाटील, डॉ. कमलाकर इंगळे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. शारदा शिरोळे, डॉ. माणिक पाटील, डॉ. योगेश पुरी, डॉ. प्राजक्ता शितोळे, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. रोहित पवार, प्रा. लक्ष्मी गलानी, प्रा. मेघा गायकवाड, प्रा. अमित येवले, प्रा. गिरीश पाटील, नदीम देशमुख, इतर प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले अमोल शिंदेंचे अभिनंदन!, काय म्हणाले?