ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 मार्च : आई म्हणजे प्रेमाचा सागर, आई म्हणजे जीवनाचा आधार आणि आई म्हणजे सर्वस्व. आईचे प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थ आणि पवित्र प्रेम आहे. आईचा आशिर्वाद असला तर व्यक्ती जगही जिंकतो, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या शोकसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाचोऱ्यात शोकसभेचे आयोजन –
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनीतील शिवतीर्थ याठिकाणी आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय, सामाजिक, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना –
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या शोकसभेत विकास पाटील, राजेंद्र सोनार, अजहर खान, पी व्ही पाटील सर, दुशान्त रावल, अभिलाषा रोकडे, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यावतीने शांताराम चौधरी तर पत्रकार बांधवांच्यावतीने सी.एन. चौधरी तसेच आराध्या विजय पाटील, भाजपचे सदाशिव आबा, अस्मिता पाटील, प्राचार्य सुनील पाटील, नितीन तावडे, पंचायत समितीच्या माजी सभापती वंदनाताई पाटील, नाना वाघ, नाना पाटील, स्मिता भिवसने, निवृत्ती मोरे, गोकुळ पाटील, रमेश बाफना, मयूर बागवान, मयंक विजय पाटील, आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.