नवी दिल्ली, 2 एप्रिल : यूपीएससीमध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा तसेच अनेक अटेम्ट दिल्याचा आरोप असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकरवर नऊ महिन्यानंतर समोर आली आहे. पूजा खेडकवर असलेल्या आरोपांवरून तिचे आएएस पद रद्द करत तिच्यावर युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ती फरार झाली होती. मात्र, आज ती चौकशीसाठी हजर झाली. यावेळी तिने नऊ महिन्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधलाय.
पूजा खेडकर काय म्हणाली? –
दिल्ली पोलिसांकडे चौकशीसाठी हजर झालेल्या माध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी पूजा म्हणाली की, मी तपास यंत्रणेला मदत करायला तयार असून दरवेळी तसे प्रतिज्ञापत्र सबमिट केलेले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात मी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर त्या अनुषंगाने आज माझे स्टेटमेंट घेतले जाणार असून या प्रकरणाची कार्यवाही पुढे जाईल.
दरम्यान, माझ्यावर झालेले आरोप हे सर्व खोटे असून आवश्यक त्या चौकशीसाठी मी सामोरे जायला तयार आहे. यासाठी क्राईम ब्रँचलाही मी मेल केला आहे. चौकशीसाठी मला कॉल करा, मी स्टेटमेंट देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे मी स्वतः चौकशीसाठी आज येथे हजर झाली असल्याचे पूजा म्हणाली.
माझ्यावर झालेले आरोप खोटे –
पूजा खेडकर पुढे म्हणाली की, आईचे नाव लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील आईचे नाव लावतात. मी कधीही वेगवेगळी नावे दिलेली नाहीत. दिलीप आणि दिलीपराव या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत का? मीडियाने काहीतरी द्वीस्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मीडियासमोर चुकीची माहिती गेली आहे. मी नाव बदलले, जास्तीचे अटेम्ट दिले, दिव्यांग प्रमाणपत्र खोटी दिली.. हे सगळे खोटे असल्याचे पूजा म्हणाली.