जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून गारठा वाढला आणि त्यानंतर झालेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आणि त्यानंतर पुन्हा थंडी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानाचा अनेकांना फटका बसला असून या हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे.
बदलत्या हवानाचा फटका अनेकांना बसल्याने मागील फक्त दोन आठवड्यांत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत तब्बल 49 हजार 377 रुग्णांनी तपासणी केली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्दी व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे हा परिणाम आहे. तसेच यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या दोन आठवड्यांतच जवळपास ५० हजार रुग्णांनी तपासणी करून घेतली आहे. त्यानुसार एका दिवसात जवळपास 3 हजार रुग्ण ओपीडीमध्ये तपासणी करून घेत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची अधिक संख्या असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानातही वाढ झाली होती. तर आता पुन्हा कोरडे हवामान होऊन, गारठा वाढला आहे. थंडी जाणवायला लागली आहे. या सर्व बदलत्या हवामानाचा परिणाम सर्वाधिक लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी असते. त्यामुळे बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे. अशा परिस्थितीत सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये 70 ते 80 टक्के ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा समावेश आहे.
गेल्या 2 आठवड्यांतील तालुकानिहाय रुग्णांची संख्या –
अमळनेर – 2 हजार 130
भडगाव – 2 हजार 580
भुसावळ – 2 हजार 236
बोदवड – 975
चोपडा – 5 हजार 335
चाळीसगाव – 5 हजार 809
धरणगाव – 1 हजार 781
एरंडोल – 1 हजार 588
जळगाव – 4 हजार 577
जामनेर – 4 हजार 508
मुक्ताईनगर – 3 हजार 615
पाचोरा – 2 हजार 975
पारोळा – 770
रावेर – 4 हजार 794
यावल – 5 हजार 704
….अन्यथा थेट तुरुंगात जाल; जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सर्व पालकांसाठी महत्त्वाची सूचना