महेश पाटील, प्रतिनिधी
गिरड (भडगाव), 26 फेब्रुवारी : एककीडे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नसताना निसर्ग देखील ऐनवेळी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तापामानात बदल झाला आहे. याचा परिणाम शेतपिकांवर होत आहे.
वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान –
भडगाव तालुक्यातील गिरड येथून जवळच असलेल्या अंजनविहिरे शिवरातील पिंपरखेड रस्त्यालगत ऐन काढणीवर आलेल्या ज्वारीच्या पिकांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
दिवसा कडक ऊन तर रात्री थंडी तर कधी जोरात सोसट्याचा वारा यामुळे शेत पिकांवर परिणाम पिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
हेही वाचा : पारोळा तालुक्यात दुचाकी घसरल्याने अपघात, तीन जण जखमी