महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव, 29 मे : भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची येथे 29 मे बुधवार रोजी वानराचा उन्हामुळे मृत्यू झाला होता. या वानराचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपारिक पध्दतीने त्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, अंतुर्ली बुवाची या गावात वानराचा दशक्रियाविधी पार पडला.
अंतुर्ली येथे वानराचा केला दशक्रियाविधी –
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली गावात एक माकड आले असताना त्याला उन्हाचा फटका बसला. यानंतर गावातील काही तरूणांनी ह्या माकडावर पाचोरा येथील रूग्णालायात उपचार करण्याचे ठरविले. उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच ह्या माकडाचा मृत्यू झाला होता. यानंतर गावतील नागरिकांनी माकडाची अंत्ययात्रा काढली. दरम्यान, तीन दिवसानंतर ह्या वानराचा दशक्रियाविधी पार पडला. वानराच्या दशक्रियाविधीसाठी गोपीचंद हडसन बिडेकर तसेच सुरेश हडसन बिडेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी अंतुर्लीचे माजी सरपंच माधवराव भिवसन पाटील यांच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
वानराची निघाली होती अंत्ययात्रा –
एखादी व्यक्ती मयत झाली की, त्याच्यावर अंत्यविधीचे ज्या पद्धतीने संस्कार करण्यात येतात अगदी त्याच पद्धतीने अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडून अंतुर्ली येथे मृत माकडाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. माणसाप्रमाणे त्या मृत माकडास विधीवत अंघोळ घालून वाद्यासह ही अंत्ययात्रा काढण्यात आली़ होती. यामध्ये चार खांदेकरीसह सगळ्यांनीच डोलीवजा तिरडीला खांदा दिला आणि दिवटी धरणार्याने पाणी दिले होते. दरम्यान, या माकडाच्या निधनानंतर गावात तीन दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करत तीन दिवसानंतर दशक्रिया विधी करण्याचे ठरवले असताना आज ही विधी पार पडली.
हेही वाचा : भडगाव तालुक्यातील अंतुर्लीत माकडाचा मृत्यू, गावातील नागरिकांनी काढली अंत्ययात्रा