जळगाव, 12 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणूक ही दोन-तीन महिन्यांवर आली असतानाच जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापायला सुरूवात झालीय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून ते अमळनेरात आयोजित केलेल्या युवा संवाद मेळावा तसेच शेतकरी संवाद मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत.
जनसन्मान यात्रा आज अमळनेरात –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने (अजितदादा गट) जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अमळनेरात येणार असून अमळनेरातील प्रताप कॉलेजमध्ये युवा संवाद मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर अमळनेरातील धुळे रोड येथील कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यास उपस्थित राहून शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत.
अजित पवार यांचा असा असेल दौरा –
- आज, दुपारी 1.30 वाजता मोटारीने प्रयाण अमळनेर येथील आर.के.नगर येथे आगमन
- बाईक रॅली तसेच अमळनेर येथे विविध कार्यक्रमास उपस्थिती
- दुपारी -1.45 वाजता स्वागत व चहापाणासाठी राखीव (स्थळ : – राजभवन हाऊस)
- पुष्पमाला अर्पण करण्याचा कार्यक्रम – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, – साने गुरुजी यांचा पुतळा
- दुपार नंतर – स्वच्छता / सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवणासाठी राखीव, ( स्थळ – इंदिरा भवन, स्वामी नारायण मंदिराच्या मागे, अमळनेर, जि. जळगाव )
- दुपारी 3.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह, अमळनेर येथे आगमन
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पमाला अर्पण करण्याचा कार्यक्रम
- यानंतर दुपारी 3.15 वाजता प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे आगमन व जनसंवाद यात्रा- युवा संवाद कार्यक्रमात साधणार संवाद
- सायंकाळी 5.00 वाजता मोटारीने प्रयाण कलागुरु मंगल कार्यालय, धुळे रोड, अमळनेर आगमन व जनसंवाद यात्रा – शेतकरी सन्मान संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांसोबत संवाद
- सायंकाळी 6.30 वाजता मोटारीने प्रयाण – बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल, मारवाड रोड, अमळनेर आगमन,
- रात्री 8.00 नंतर मोटारीने प्रयाण – श्री. विनोद कदम यांचे निवासस्थान, प्लॉट नं. 5, पटवारी कॉलनी, अमळनेर
- रात्री 8.00 वाजता राखीव –
- रात्री 9.00 वाजात मोटारीने प्रयाण व रात्री 10.10 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन रात्री 10.15 वाजता विमानाने प्रयाण,
- रात्री 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( गेट नं. 8), मुंबई येथे आगमन नंतर मोटारीने प्रयाण
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत