मुंबई, 17 मार्च : ज्या लाडक्या बहिणींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आम्ही त्यांना विनंती केली. आणि त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले. मात्र, योजनेद्वारे दिलेले पैसे आम्ही कधीही परत घेणार नाहीत. दरम्यान, लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही आणि गरीब महिलांच्या घटकाकरिता ही योजना असून आवश्यक तो निधी त्यासाठी दिला जाणार असल्याचे राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते आज विधानसभेत बोलत होते.
लाडकी बहिण योजना बंद होणार नाही – अजित पवार
विरोधकांकडून सातत्याने लाडकी बहिण योजनेबाबत मुद्दे उपस्थित केले जात होते. लाडकी बहिण अर्थात ती लाडकी बहिण आमची आहे आणि तुम्ही दोडके झालात म्हणून ते विरोधात बसलात. विरोधक लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले होते. तसेच चुनावी जुमला आहे, असेही ते म्हणाले होते. मात्र, चर तो चुनावी जुमला असता ना तर लाडक्या बहिणींना होळीला 3 हजार रूपये दिले नसते. म्हणून लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, असे अजित पवार यांनी आज स्पष्ठ केले.
कधी-कधी योजना येतात. त्यामध्ये काही गोष्टी लक्षात आल्यावर त्यामध्ये दुरूस्ती केली जाते. म्हणून आम्ही लाडकी बहिण योजनेत काही दुरूस्ती करणार आहोत. मात्र, ही योजना बंद करणार नाही आणि गरीब महिलांवर अन्याय करणार नाही. ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. यासोबतच लाडकी बहिण योजनेसाठी पुरेसा निधी देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात आज दिले.
दरम्यान, लाडक्या बहिणींविषयी आम्हाला जाणीव ज्याप्रमाणे अगदीच त्याच पद्धतीने त्या बहिणींनी देखील आहे. लाडकी बहिणीची भावावर माया असते. आणि म्हणून तिच्या भावाला कधीच ती अडचणीत आणत नाही, असेही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा : Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर