ठाणे, 17 मार्च : राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असून ही कबर हटविण्यासाठी विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरा’चे (शक्तिपीठ) लोकार्पण कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत महत्वाचं भाष्य केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या औरंग्याची कबर कशाला हवी. पण एएसआयने 50 वर्षांपुर्वी सरंक्षित म्हणून स्थळ घोषित केलं आणि त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य तसेच केंद्र सरकारवर आहे. खरंतर, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं हे मोठं दुर्दैव आहे. दरम्यान, काहीही झालं तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं महामंडन तसेच उदात्तीकरण होऊ देणार नाही.
दरम्यान, औरंग्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्याला चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, असे वचन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिरासमोर देतो, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. या देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं महिमामंडन होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘औरंगजेबाची कबर हटाव आंदोलन’ –
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केला जातोय. यावरून वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज शिवजयंती दिनी विश्व हिंदू परिषदेचे आज राज्यभर ‘औरंगजेबाची कबर हटाव आंदोलन’ सुरू केलं आहे. आणि औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे. औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी नागपूर, पुणे, कोल्हापूर तसेच सिल्लोडमध्ये बजरंग दलाकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर