• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 15, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

जळगाव, 15 जुलै: राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून किमान आधारभूत किमतीअंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) ज्वारी विक्रीची आणखी संधी उपलब्ध झाली आहे.

ज्वारी खरेदीस मुदतवाढ मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, संचालक मंडळ व प्रशासनाने राज्य आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री जयकुमार रावळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पणन महासंघाने केंद्र शासनाकडे याबाबत विशेष विनंती केली होती. केंद्र शासनाने ही विनंती मान्य केली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खरेदी प्रक्रिया राबविताना केंद्र शासनाच्या पत्रातील सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी दिली.

यंदा राज्यात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, खुल्या बाजारातील ज्वारीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने ज्वारी विक्री करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना शासकीय दराचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातील कमी दरामुळे घाबरून न जाता शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्री करावी. राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी पणन महासंघ कटिबद्ध असल्याचे महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांनी सांगितले.

हेही वाचा: VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsSorghumsorghum procurementsorghum procurement procurement deadline extendedsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page