देगलूर (नांदेड), 27 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविदयालय, देगलूर, येथे वनस्पतीशास्त्र पदवी व पदव्युत्तर विभागाच्या वतीने वनस्पतीशास्त्र विषयात AI चा वापर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन काल करण्यात आले होते.
यावेळी शरदचंद्र महाविदयालय, नायगाव येथील प्राध्यापक दर्शन तळहांडे यांनी वनस्पतीशास्त्र विषयात AI चा वापर या विषयावर विदयार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या क्रार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ उपस्थित होते. तर उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, विभागप्रमूख डॉ एच. एम. लाकडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. केशव नरवाडे, उपप्राचार्य डॉ. व्यंकट शेरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दर्शन तळहांडे यांनी वनस्पतीशास्त्रात कृत्रिम बुद्धिमतेचा आजमितीस कसा उपयोग केला जात आहे, हे अनेक उदाहरणा-सह स्पष्ट केले तसेच वनस्पतीशास्त्रातील विविध शाखांमध्ये संशोधनासाठी भविष्यकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग महत्वाचा ठरणार आहे. केवळ वनस्पतीशास्त्रात मर्यादित न राहता या देशातील शेती व शेतकरी यांच्यासाठी कृत्रिम बुद्धिधमत्ता हा वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. मंजूषा आलूरे यांनी केले. पाहूण्यांचा परिचय प्रा. जवेरीया फातिमा यांनी करून दिला तर आभार प्रा. अश्विनी बोडके यांनी मानले. या कार्यक्रमास तिरुपती उरलागोंडावार यांच्यासह पदवी व पदव्युत्तर वर्गातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.