जळगाव, 3 ऑगस्ट : मन्याड धरणाबाबतच्या मागण्यांसाठी वारंवार निवदेन तसेच आमरण उपोषण करूनही त्या मागण्या पुर्ण होत नसल्याने शेतकरी संघटनेचे दिलीप पाटील यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने येत्या 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मन्याड धरणाबाबतच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्ण कराव्यात, अन्यथा मी 15 ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिलीप पाटील यांनी दिला आहे.
निवदेनात काय म्हटलंय? –
दिलीप पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला टपालद्वारे दिलेल्या निवदेनात नमूद केल्यानुसार, गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे, गिरणा धरण, पावसाळयात फुल भरल्यानंतर ओव्हर फ्लो होणारे पाणी मन्याड धरणात टाकणे, रोटेशन पध्दतीने पाणी मन्याड धरण्यात टाकण्यात यावे, मन्याड धरणाची उंची वाढवणे, यासह अनेक मागण्यांसाठी 7 मार्च 2024 पासून 10 दिवसांचे आमरण उपोषण केले होते.
मागण्या पुर्ण न होत असल्याने आत्मदहनाचा इशारा –
दरम्यान, त्यावेळी जलसंपदा विभागातील अधिका-यांनी मागण्याबाबत आश्वासन दिले होते, पण खुप दिवस होवूनही मागण्यांबाबत कुठलीही पुर्तता झालेली नाही. हे पाहता वरील मागण्यासाठी आता आत्मदहन हाच एक पर्याय उरला आहे. स्वातंत्र्यानंतर 77 वर्षे होत आली आहेत, स्वातंत्र्य मिळूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय हि खेदाची बाब आहे. आमच्या मागण्या 14 ऑगस्ट 2024 दुपारी 1 प्रर्यंत पुर्ण कराव्या, अन्यथा मी येणा-या 15 ऑगस्ट 2024 रोजी चाळीसगांव येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा दिलीप पाटील यांनी दिला आहे. निवेदनावर दिलीप पाटील यांच्यासह अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, रामकृष्ण महाजन, सईद देशमुख, भिमराव जाधव, आदींच्या सह्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवदेन स्विकारले नाही? –
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवदेन देण्यासाठी आलेल्या दिलीप पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला गेलो असता त्यांनी आमचे निवदेन स्विकारले नाही. कारण आत्मदहन हा शब्द निवदेनातून काढा आणि चर्चा करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मी आत्महत्या आणि आत्मदहन करण्याचा इशारा देणाऱ्यांचे निवदेन स्विकारत नसतो, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले. दरम्यान, मागण्या जर पुर्ण होत नसतील तर आत्महदहन करण्याचा इशारा देणे, हे काही गुन्हा आहे अर्थात मग भारतात लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल दिलीप पाटील यांनी उपस्थित केला.
मन्याड धरणाच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे –
- गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे.
- गिरणा धरण पावसाळ्यात फुल झाल्यावर ओव्हर फ्लो होणारे पाणी मन्याड धरणात टाकणे.
- मन्याड धरणाची उंची वाढवणे.
- कॅनॉलची दुरुस्ती करणे.
हेही वाचा : 11 महिन्यांचा असताना वडिलांचं निधन, मामाकडे राहून शिकला अन् पारोळ्याचा प्रफुल झाला PSI, प्रेरणादायी स्टोरी