पाचोरा, 3 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील बाराखोली व गफूर नगर परिसारत रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी-संगम व इनरव्हील क्लब ऑफ मिल्कसिटी चाळीसगाव यांच्यावतीने अतिवृष्टी बाधित कुटुबांना मदतीचा हात देण्यात आला. यावेळी “माणुसकीची भिंत ” उपक्रमातर्गंत अतिवृष्टीने बाधित झालेल्या जवळपास 150 कुटूंबांना एक आठवडा पुरेल असा शिधा वाटप करण्यात आला.
तांदूळ, गहूपीठ, साखर, चहा, तूरदाळ तसेच तेल आदी वस्तूंचा समावेश असलेले किट पूरग्रस्त लोकांना घरोघरी जावून वाटप करण्यात आले. याप्रसंगी नियतीने सारे हिसकावून घेतलेल्या कुटुंबाला एक आशेचा किरण जागवला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी रोटरी एन्कलेव्ह चेअरपर्सन रविंद्र शिरूडे, प्रोजेक्ट चेअरमन कुणाल रुईकर, रोटे अध्यक्ष श्रीकृष्ण अहिरे, रोटे माजी प्रेसिडेंट सुधीर आबा, प्रा. भागवत महालपुरे, रोटे प्रकाश कुळकर्णी, रोटे आधार महाले, रोटे सुभाष करवॉ, रोटे बालाप्रसाद राणा व इनरव्हिल पदाधिकारी मनिषा शिरूडे, निगार चव्हाण, स्मीता करमरकर व लक्ष्मी त्रिखत्री यांचे हस्ते पूरग्रस्त क्षेत्रात घरोघरी जाऊन कुटुंब धारकाला शिधाकीट देण्यात आले.
माणुसकीची भिंत या उपक्रमातून खऱ्या अर्थाने गोरगरीब पूरग्रस्ताची सेवा म्हणजेच शिवभावे जीवसेवा घडली. ही उर्मी मला शांत बसू देत नव्हती. ती कृतीत उतरली म्हणून मला धन्यता वाटते. याचं सर्व श्रेय रोटेरियन्स यांना द्यावेसे वाटते, असे यावेळी एन्क्लेव्ह चेअरपर्सन रूरल जळगावचे रोटे रविंद्र शिरूडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कोषाध्यक्ष शालिग्राम निकम यांनी केले. यावेळी सातगाव डोंगरीचे रहिवाशी प्रा भागवत महालपुरे व स्थानिक रहिवाशांनी वाटपाचे यथोचित नियोजन केले. एक मदतीचा हात… माणूसकीची भिंत म्हणून ह्या उपक्रमाचे कौतूक ग्रामस्थांनी केले व आभार प्रा भागवत महालपुरे यांनी मानले.
रफिक तडवी, बालु बोरसे, बाबुलाल तडवी, आबा शेंडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील,मा. मुख्याध्यापक मनगटे, देविदास वाघ, आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खाटीक,लहानु तडवी,अशोक मानखा तडवी, सुपडु पठाण, बाबाशाह आदी उपस्थित होते.
हेही वाचा : मोठी बातमी! अखेर, एसटीची प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ रद्द