ईसा तडवी, प्रतिनिधी
नांद्रा, ता. पाचोरा, 7 डिसेंबर : नांद्रा येथील कल्याणजी आश्रम श्रीराम टेकडीवर आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण मेळावा कुरंगी नांद्रा बांबरुड गटातून संपन्न झाला. महिला सक्षमीकरण संदर्भात आयुष्यमान भारत कार्ड, श्रम कार्ड, बाल संगोपन योजना, कृषी योजना, विमा योजना, बचत गटांसाठी स्वयंरोजगार योजना, विविध प्रकारच्या महिलांसाठी कर्जदायी योजना, अशा विविध लोककल्याणकरी विविध सामाजिक व वैयक्तिक लाभार्थी योजना यांच्या विषयी माहिती होण्यासाठी नांद्रा बस स्थानकाजवळ लोकसेवा केंद्राचे लोकार्पणही करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, कृषी अधिकारी रमेश जाधव, प्र. गटविकास अधिकारी भालेराव सर,सहाय्यक कामगार आयुक्तालयाचे जगदीश पाटील, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीच्या आदेशानुसार आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वीपणे संपूर्ण पाचोरा तालुक्यातच नव्हे तर गटा-गटातून या मेळाव्याचे आयोजन केले. तसेच शासनाच्या विविध योजना यांच्या माहितीसाठी व दलालांच्या विळख्यातून सर्वसामान्य लोकांची पिळवणूक थांबवण्यासाठी व सर्वसामान्यांची आर्त हाक शासन दरबारी पोहोचवण्याचे कार्य केले आहे. तसेच बचत गटांच्या सीआरपीच्या मानधनात वाढ, संजय गांधी निराधार योजनेत जवळपास 700 प्रकरण मंजूर केले.
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, आपल्याला राज्य सरकारनं महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींसाठी पन्नास टक्केच एसटीची तिकिटाची सवलत दिली आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपयांचा पॅकेज केले. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही कपाशी पिकाला पाहिजे तसा भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. तरी आपण शासन दरबारी प्रतिक्विंटल 1000 रुपये प्रतिक्विंटल विशेष अनुदान शेतकऱ्यांसाठी देण्याचीही मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलेली आहे.
यावेळी शासनातर्फे विविध विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कामगार आयुक्तालयाचे जगदीश पाटील, कृषी अधिकारी रमेश जाधव, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी आपापल्या विभागातील विविध विषयातून महिला सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, किरण पाटील सुभाष तावडे, माजी सभापती पंढरीनाथ पाटील, माजी जि. प. सदस्य पदम पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, पवन पाटील, विलास रमण पाटील, बाळू तात्या पाटील, युवराज काळे, मुराद पटेल, शरद पाटील,अर्चना पाटील साधनाताई देशमुख यांच्यासह कुरंगी बांबरुड गटातील सरपंच, उपसरपंच, महिला बचत गटांचे पदाधिकारी अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकाताई, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.