• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 9, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 9 जुलै: राज्यात बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती, समुपदेशन, कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य प्रशांत बंब आणि कैलास पाटील यांनी अर्धा तास चर्चेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.

मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या? –

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार मुलींसाठी विवाहाचे किमान वय १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे असून, त्यापेक्षा कमी वयातील विवाह हा कायद्याने गुन्हा आहे. विशेष विवाह कायदा आणि इतर वैयक्तिक कायद्यांमध्येही हीच वयोमर्यादा लागू आहे. भारतीय सज्ञानता कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सज्ञान मानली जाते आणि तिला वैयक्तिक निर्णय घेण्याचा तसेच जोडीदार निवडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे पालकांची सहमती किंवा असहमती यावर आधारित वेगवेगळ्या वयोमर्यादा निश्चित करणे हे संविधानातील समानतेच्या तत्त्वाशी सुसंगत ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुलींच्या विवाहाचे किमान वय १८ वरून २१ वर्षे करण्यासाठी केंद्र सरकारने मांडलेले सुधारणा विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. विवाहाचे वय बदलायचे असल्यास ते सर्वांसाठी समान स्वरूपातच कायद्याने बदलणे हा घटनात्मकदृष्ट्या योग्य मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात बालविवाह रोखण्यासाठी विविध स्तरांवर प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगत मंत्री तटकरे म्हणाल्या, बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित मुलगी किंवा मुलगा अल्पवयीन असल्यास पालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाते. तसेच विवाह लावून देणारे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संबंधित व्यक्ती, आयोजक यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई केली जाते.

राज्य सरकार नवीन बालधोरण तयार करत असून त्यामध्ये मुलांचा सोशल मीडियाचा वापर, स्क्रीन टाइम, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम आणि आवश्यक निर्बंध यांचा विचार करण्यात येणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून विवाहविषयक कायद्यांमध्ये भविष्यात सुधारणा करण्याबाबत राज्यांचा अभिप्राय मागविण्यात आल्यास, बालविवाह प्रतिबंध आणि तरुणांच्या हिताचे आवश्यक मुद्दे राज्य शासनाच्या वतीने मांडले जातील, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

बातमी शेअर करा !
Share
Tags: counsellingmarathi newsminister aditi tatkareprevent child marriagepublic awarenesssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

July 9, 2026
गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

July 9, 2026
“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

July 8, 2026
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

July 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page