ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा (जळगाव), 11 फेब्रुवारी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय – मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव व किशोर आप्पा बहुउद्देशीय संस्था पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा सन 2023-24 पाचोरा येथील एम.एम.कॉलेज क्रीडांगणावर संपन्न झाल्या.
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2024 या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उद्घाटन केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक धनसिंग सुदरडे समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी व जळगाव जिल्ह्यातील मतिमंद, अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, बहुविकलांग प्रवर्गातील विद्यार्थी व विशेष शाळेतील कर्मचारी वृंद तसेच पाचोरा नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तद्नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅली एम.एम.कॉलेजकडे रवाना करण्यात आली. यावेळी जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा व कार्यशाळा यांनी सहभाग घेतला.
एम.एम.कॉलेज क्रीडांगणावर रॅलीचे आगमन झाल्यानंतर आमदार किशोर पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न समिती सभापती गणेश बापू पाटील, माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल, जितू भाऊ जैन, पुनगावचे सरपंच अनिल पाटील, मीनाक्षी निकम स्वयंदीप दिव्यांग बहुउद्देशीय चाळीसगाव, मुकुंदा गोसावी मुक्ती फाउंडेशन जळगांव, गणेश पाटील संघर्ष बहुउद्देशीय संस्था जळगांव समवेत कार्यक्रम सुरूवातीला लुईस ब्रेल, हेलन केलर व सरस्वती प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले.
जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या कल्याणाकरीता जि.प 5 टक्के सेस फंडातून स्वयंचलित बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकल पूजा कोळी लोहारा, रफिक करीम मन्यार लोहारा, धनराज विक्रम पाटील तारखेडा ह्या दिव्यांग लाभार्थींना वाटप करण्यात आल्या.
जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या 25, 50, 100, 200, 400 मीटर धावणे,गोळा फेक, सॉफ्ट बॉल र्थो, बुद्धीबळ, स्पॉट जंप, लांब उडी, 25 मीटर भरभर चालणे, बादलीत बॉल टाकणे, लगोरी फोडणे ह्या मतिमंद , अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, बहुविकलांग प्रवर्गाच्या मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करून क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या व बक्षिस वितरण वाटप करण्यात आले.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन स्व.कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालय पाचोरा विशेष शिक्षक अक्षय गरये यांनी केले. जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगांव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आळंदीत गौरद्गोगार