जळगाव, 17 एप्रिल : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या 21 एप्रिल रोजी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे.
21 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन –
समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो.
या अनुषंगाने येत्या 21 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थीत राहण्याचे आवाहन माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी केले आहे.
हेही वाचा : शिवजयंतीचा मुद्दा, मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले, “तुम्ही मुख्यमंत्री असताना……”