• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! डॉ. उल्हास पाटील यांचा कन्या केतकीसह भाजपात प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 24, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
मोठी बातमी! डॉ. उल्हास पाटील यांचा कन्या केतकीसह भाजपात प्रवेश

मुंबई, 24 जानेवारी : प्रदेश काँग्रेसने निलंबित केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटील, पत्नी वर्षा पाटील यांच्यासह भाजपत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत रावेर तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो समर्थकांनी देखील भाजपत प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्या गळ्यात भाजपचे मफलर घालत त्यांचे भाजपत स्वागत केले.

काय आहे संपूर्ण बातमी? –
काँग्रेस पक्षाने तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी वर्षा पाटील व काँग्रेसचे पदाधिकारी देवेंद्र मराठे यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले होते. दरम्यान, यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी तत्काळ पत्रकार परिषद काँग्रेसच्या निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत पुढील दोन दिवसांत भूमिका जाहीर करेन, असे सांगितले. दरम्यान, या दिवसांच्या आतच डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांसह भाजपत प्रवेश केला आहे.

केतकी पाटील यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती –
मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात डॉ. उल्हास पाटील हे पत्नी व कन्येसह भाजपत दाखल झालेत. दरम्यान, डॉ. केतकी पाटील यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसे युवक अध्यक्ष देवेंद्र मराठे, शैलेश राणे, संदेश पाटील, पुंजाजी पाटील व पाटील यांचे शेकडो समर्थकांनीही भाजपात प्रवेश केला.

मुंबईत पार पडलेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यास मंत्री गिरीश महाजन, आशिष देशमुख, माजी आमदार जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी, रावेर जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, आमदार मंगेश चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, रोहित निकम, नंदकुमार महाजन, सुभाष पाटील आदी भाजपचे नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

February 22, 2026
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

February 22, 2026
भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नोकरीच्या ऑफर लेटर्सचे वितरण

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

February 22, 2026
मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page