ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 जुलै : पाचोरा तालुका शेतकरी सेनेची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात समाजात चांगली ओळख असलेले, शेतीत प्रगती करणारे आणि प्रेरणादायी कार्य करणारे प्रतिभावान कार्यकर्ते सहभागी करण्यात आले आहेत. या नव्या कार्यकारिणीमार्फत शेतीसंबंधित समस्यांचे समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार असून यामाध्यमातूनच शेतकरी बांधवांसाठी ठोस आणि सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. पाचोरा तालुका शिवसेना शेतकरी सेनेची कार्यकारिणी आज 27 जुलै रोजी दुपारी शिवतीर्थ शिवसेना कार्यालयावर येथे जाहीर करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
शिवसेनेच्या शेतकरी सेनेमार्फत तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम राबवले जातील. तसेच शेती नफ्यात आणण्यासाठी ‘शेती शाळा’, नवतंत्रज्ञानाचा वापर, पद्धतींमध्ये सुधारणा, शासकीय योजनांचा लाभ तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक संकल्पनेची दिशा असून, “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण” या तत्त्वावर कार्य करत शेतकरी सेनेचे पदाधिकारी समाजसेवेचा वसा घेऊन कार्य करतील, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अखेरीस आमदारांनी शेतकरी सेनेतील पदाधिकाऱ्यांना भविष्यात समाजात मानाचे स्थान मिळेल, असा विश्वास व्यक्त करत नव्या कार्यकारिणीच्या कामाला शुभेच्छा दिल्या.
पाचोरा तालुका शिवसेनेच्या शेतकरी सेनेची कार्यकारणी जाहीर –
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर व तालुकाप्रमुख विनोद तावडे, राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा तालुका शेतकरी सेनेची तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. यावेळी शिवशक्ती भीमशक्ती आघाडीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राह्मणे तसेच शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख हेमंत चव्हाण यांचेसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
- पाचोरा तालुका शेतकरी सेनेची तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आली आहे –
- अॅड. दीपक रामदास पाटील (गाळण) – शेतकरी सेना तालुकाप्रमुख
- समाधान सीताराम पाटील (शिंदाड) – तालुका उपप्रमुख
- देविदास वना पाटील (चिंचखेडा) – तालुका उपप्रमुख
- विश्वास आनंदा ठाकरे (खडकदेवळा) – तालुका उपप्रमुख
- अशोक बाबुराव पाटील (कोल्हे) – तालुका उपप्रमुख
- मयूर रामचंद्र वाघ (बांबरुड राणीचे) –तालुका उपप्रमुख
- सुनील अशोक महाजन (कृष्णापुरी) – तालुका संघटक
- अॅड. देविदास संतोष सावळे (डोंगरगाव) – तालुका संघटक
- गोपाल दत्तू पाटील (तारखेडा) – तालुका संघटक
- मयूर जगदीश शेलार (कृष्णापुरी) – शहर प्रमुख
- अमोल जयराम पाटील (गाळण) – विभाग प्रमुख
- योगेश धनराज पाटील (भोजे) – विभाग प्रमुख
- गजानन भास्कर पाटील (कुरंगी) – विभाग प्रमुख
- तुषार भगवान सांबरे (शिंदाड) – उपविभाग प्रमुख
- विलास भागवत डांबरे (सातगाव) – उपविभाग प्रमुख
- नितीन यशवंत खासेराव (निंभोरी) – उपविभाग प्रमुख
- गोपाल देवसिंग पाटील (लासगाव) – उपविभाग प्रमुख
- कृष्णराव प्रभाकर पाटील (कृष्णापुरी) – विभाग प्रमुख
- कैलास शिवाजी पाटील (आसनखेडा) – विभाग प्रमुख
- ज्ञानेश्वर दिवसेंद पाटील (कुरंगी) – विभाग प्रमुख