• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुण्यात रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक; दोन महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 27, 2025
in महाराष्ट्र, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पुण्यात रेव्ह पार्टी; एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक; दोन महिलांसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे, 27 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या रेव्ह पार्टी प्रकरणात यांच्यासह दोन महिलांसह पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून दारू, ड्रग्स, गुटखा आणि अंमली पदार्थ पोलिसांना जप्त केले.

नेमकं बातमी काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हाऊस पार्टीसाठी तीन फ्लॅट बूक करण्यात आले होते. यापैकी एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरु होती आणि या पार्टीत ड्रग्जचे सेवन केले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. दरम्यान, या माहितीच्या आधारे पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत या फ्लॅटमध्ये दोन महिला आणि पाच पुरुष आढळून आले असून पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली.

नाथाभाऊंच्या जावयाला अटक –

पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई तसेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडल्यामुळे त्यांना देखील पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रांजल यांनी ड्रग्ज सेवन केले होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सातत्याने सरकारविरोधात आरोप करत होते. अशातच त्यांच्या जावईला अटक करण्यात आल्याने राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता वर्तविली जातेय.


एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया –

प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत याबाबत एकनाथ खडसे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, यासंदर्भातील मला माहिती माध्यमांकडूनच पहिल्यांदा भेटत आहे आणि हे होणारच होतं हे मला माहीत आहे. तसेच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असून राजकीय सुडबुद्धीतून कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याचेही खडसे यांनी स्पष्ठ केले आहे.  या प्रकरणी स्थानिक पोलीस अजिबात तपास करणार नाहीत कारण त्यांच्यावर दबाव असू शकतो. मात्र, जो दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया –

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी आज सकाळीच संवाद साधला. मंत्री महाजन म्हणाले की, याप्रकरणात पोलिस तपास करत आहे. त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण जी माहिती हाती आली आहे. त्यानुसार, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते.  त्यांचा समावेशच नव्हता तर त्यांनी ही पार्टी आयोजित केली होती, असा आरोप महाजन यांनी केला. स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

हेही वाचा : “अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी!”, खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर संजय राऊत संतापले

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath khadsegirish mahajanpranjal khewalkarrave party case punesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 7, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

August 7, 2026
पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय आक्रमक; शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप

पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय आक्रमक; शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप

August 7, 2026
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

August 7, 2026
पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page