इंद्रनील पाटील, प्रतिनिधी –
तारखेडा (पाचोरा), 16 फेब्रुवारी : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवरील समुहांचे प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आज तारखेडा येथे गोपाळ पाटील यांच्या शेतात नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग पाचोरा आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गाव पातळीवर शेतकरी समुहाचे प्रशिक्षण –
तारखेडा येथील गोपाल दत्तु पाटील यांच्या शेतात गाव पातळीवर शेतकरी समुहाचे प्रशिक्षण कार्यक्रमात नितीन रमेश वारके यांनी नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन केले तर जामनेरातून येथून आलेले मनोज सुभाष पाटील यांनी सेंद्रीय शेती, विषमुक्त शेती, जैविक शेती याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात दशपर्णांक बीज प्रक्रिया, तरल खत तयार करणे तसेच बायोडायनामिक डेपो लावणे याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव विश्राम महाजन हे होते. तर पाचोरा तालुका कृषी अधिकारी जाधव तर तारखेड्याचे सरपंच विकास पाटील यांची उपस्थित होते. तसेच तालुक्यातील कृषी विभागातील ग. व्ही. जाधव सर, बोरसे सर, वारे सर, रामेश्वर पाटील सर, भैरव सर, इतर सर्व अधिकारी-कर्चमारी वर्ग उपस्थित होते. तसेच गावातील संजय पाटील, दिनकर बागुल, वसंत वाघ, अरूण पाटील, दिलीप पाटील, परशुराम माडोळे तसेच नगरदेवळा, पाचोरा-भडगाव परिसरातील 150 ते 200 शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा : ‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’, भडगाव येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?