ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 24 जानेवारी : पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना महत्वाची बातमी समोर आली आहे. पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणुकीत विरोधी पॅनलमधील उमेदवारांनी माघार घेतल्याने आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पॅनलच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत 15 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. तत्पूर्वी, आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित 12 जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडणार होती. या निवडणुकीत 24 जानेवारी ही उमेदवारांसाठी माघार घेण्याची अंतिम तारीख होती.
दरम्यान, आज विरोधी गटातील पॅनलमधील उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक न लावता सामंजस्याची भूमिका घेत माघार घेतली. यामुळे आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पॅनलचे उर्वरित 12 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानत नवनियुक्त संचालकांचा सत्कार केला आणि त्यांना योग्य सूचना दिल्या. हेही वाचा : कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता