• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले! तब्बल २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 10, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले! तब्बल २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जळगाव, 10 ऑक्टोंबर : तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर 2023 अखेर 108 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1437 प्रकरणात 2 लाख 82 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा –
तंबाखू मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हा तंबाखू नियंत्रण व मौखिक आरोग्य समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर, अनिल गुंजे तसेच पोलीस ,आरोग्य, अन्न व औषध विभाग शिक्षण व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत सूचना –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत विविध विभागांना सूचना दिल्या. यामध्ये पोलीस, आरोग्य, अन्न औषध व शिक्षण विभागाने कोटपा- 2003 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कलम 5 व कलम 7 अंतर्गत मासिक किमान 10 कारवाई करण्यात याव्यात. शाळेच्या 100 यार्ड परिसरात असणाऱ्या पान टपरी, तंबाखू तथा तंबाखू विक्री केंद्रावर करवाई करून त्यांना तिथून हटविण्यात यावे. जीएसटी विभागामार्फत तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीचा मासिक अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा.

जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना –
तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे नशामुक्तीसाठी समुपदेशन करण्यात यावे. त्याचप्रमाणे तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची नोंदणी वाढविण्यात यावी. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथील दैनंदिन तसेच मासिक रुग्णसंख्या वाढवावी व जास्तीत जास्त उपचार देण्यात यावेत. मौखिक आरोग्य तसेच मुख कर्करोग प्रतिबंध विषयावर जनजागृतीपर संदेश तयार करून सोशल मिडिया द्वारे प्रसारित करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जनजागृतीबाबत उपक्रम –
जिल्ह्यातील नागरिकांनी तंबाखूचे सेवन थांबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. जिल्हा प्रशासन जनजागृती उपक्रम राबवित आहे. पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलीस दलाद्वारे आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा तंबाखूमुक्तीसाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgaon updatesतंबाखूमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking!, An important decision regarding Pachora taluka was taken in today's meeting of the state cabinet, read in detail

ब्रेकिंग!, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पाचोरा तालुक्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

August 5, 2025
कापूस पिकाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीतज्ज्ञ सुनिल पाटील यांचं शेतकऱ्यांना महत्वाचं मार्गदर्शन

कापूस पिकाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीतज्ज्ञ सुनिल पाटील यांचं शेतकऱ्यांना महत्वाचं मार्गदर्शन

August 5, 2025
मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील ‘या’ ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल नेमण्याच्या दिल्या सूचना

मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील ‘या’ ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल नेमण्याच्या दिल्या सूचना

August 5, 2025
Pachora News : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात ‘वृक्षदिंडी’ चे आयोजन

Pachora News : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात ‘वृक्षदिंडी’ चे आयोजन

August 5, 2025
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील 795 रुग्णांना 6 कोटी 99 लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील 795 रुग्णांना 6 कोटी 99 लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

August 4, 2025
महसूल सप्ताह 2025 : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राबविण्यात आला वृक्षारोपणाचा उपक्रम

महसूल सप्ताह 2025 : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राबविण्यात आला वृक्षारोपणाचा उपक्रम

August 4, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page